राज्याच्या राजकारणात खळबळ.... मंत्री जयंत पाटील, थोरात यांच्यावर गुन्हे दाखल करा, शिवसेना खासदाराची मागणी

 राज्याच्या राजकारणात खळबळ.... मंत्री जयंत पाटील,  थोरात यांच्यावर गुन्हे दाखल करा, शिवसेना खासदाराची मागणीनगर : शिवसेनेचे शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडे कालव्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलीय. संबंधितांनी दौरा करताना कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप यावेळी लोखंडे यांनी केलाय.  काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला या पाहणी दौऱ्यात डावलल्यामुळेच शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे आक्रमक झाल्याचं बोललं जातंय.

निळवंडे डाव्या कालव्यावरील आढळा जलसेतूचा आज (22 मे) जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरेंसह आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पाहणी दौरा केला. दौऱ्यावेळी सर्व अधिकारी आणि कार्यकर्ते मिळून 100 पेक्षा अधिक लोक जमले. त्यामुळे या प्रकरणी कार्यकारी अभियंते गिरीश संघाणी व अधीक्षक अभियंते अरुण नाईक यांची चौकशी करून पदाधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी खासदार सदाशिव लोखंडे केली आहे. या पाहणी दौऱ्यावेळी सोशल डिस्टंसिंगची कोणतीही काळजी घेण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केलाय.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post