शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी खा.मुंडे यांचे पंतप्रधानांना पत्र.

 खतांच्या किंमती कमी करा, खा.मुंडे यांचे पंतप्रधानांना पत्रबीड :   रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमतींमध्ये  झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमती कमी करून बळीराजाला आधार देण्याची मागणी भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  व केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून केली आहे.

खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक आणि मिश्र खतांच्या किंमतींमध्ये केलेल्या अत्याधिक दरवाढीने राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. महामारीच्या संकटात अन्नदात्या बळीराजावर दरवाढीचा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये म्हणून तात्काळ उपाययोजना होणे आवश्यक आहे, असं खासदार प्रीतम मुंडे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून खतांच्या किंमती कमी करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीला प्राधान्य दिल्यामुळे खतांच्या किंमती कमी करण्यासंदर्भात देखील सकारात्मक पाऊल उचलले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post