फ्लिपकार्टवर मोठा सेल, मोटारोला स्मार्टफोनवर बंपर ऑफर

 

फ्लिपकार्टवर मोठा सेल, मोटोरोला स्मार्टफोनवर बंपर ऑफरमुंबई : मोटोरोलाने (Motorola) शुक्रवारी त्याच्या हँडसेट्सवर काही उत्कृष्ट डील्स आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ही ऑफर फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलसाठी आहे, हा सेल 2 मेपासून सुरू होणार आहे. हा ऑनलाईन सेल 7 मे पर्यंत चालणार आहे. यावेळी ग्राहकांना मोटोच्या (Moto) टॉप स्मार्टफोन्सवर बम्पर सूट मिळू शकते. या यादीमध्ये मोटो जी 40 फ्यूजन (Moto G40 Fusion) आणि मोटो जी 60 (Moto G60) या स्मार्टफोन्सचाही समावेश आहे. विक्री दरम्यान, ग्राहकांना त्वरित 10 टक्के सूट देखील मिळेल. त्याच वेळी, एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर सूट मिळेल. 

मोटोरोलाने एका निवेदनात म्हटले आहे की, आता वेळ आली आहे की, ग्राहकांनी आपल्या स्मार्टफोनला उत्कृष्ट फीचर्ससह अपग्रेड करायला हवं. यात कॅमेरा सिस्टम, वेगवान प्रोसेसर, लाँग बॅटरी, स्टॉक अँड्रॉइडचा अनुभव आणि अधिक फीचर्स देण्यात आले आहेत. या सर्व फीचर्ससह, ग्राहक सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन निवडू शकतात. अशा परिस्थितीत फ्लिपकार्ट सेलदरम्यान दिल्या जाणाऱ्या बेस्ट डील्स ग्राहकांनी मिस करु नये

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post