परमपूज्य मोरेदादा यांच्या पुण्यतिथीनिमित्त खंडाळ्यात वृक्षारोपण

 *दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ मार्गाचे संस्थापक परमपूज्य मोरेदादा यांच्या पुण्यतिथीनिमित्त खंडाळ्यात वृक्षारोपण*
खंडाळा(श्रीरामपुर) :दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ मार्गाचे संस्थापक सद्गुरु परमपूज्य मोरेदादा यांचा २३मे हा स्मृतिदिन.२१ मे पासून सद्गुरू मोरे दादाचे जन्मशताब्दी वर्ष सुरु झाले आहे.दादाचे जन्मशताब्दी वर्ष हे कोविडमुक्त म्हणून स्वच्छता,स्वयंशिस्त,स्वास्थ्य या त्रिसूत्रीचा अवलंबन करून ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून साजरे करण्याचे परमपूज्य गुरुमाऊलींचे नियोजन आहे.याचाच एक भाग म्हणून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पिंपळाचा वाडा खंडाळा येथे सद्गुरु परम पूज्य मोरे दादायांच्या पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.दरवर्षी सद्गुरु परमपूज्य मोरेदादा यांची पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात सेवेकरी केंद्रांमध्ये साजरा करतात परंतु यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करत हा सोहळा साधेपणाने वृक्षारोपण करण्यात आले.या वेळी सेवेकर्‍यांनी श्रमदान करून केंद्राच्या जागेत गुलमोहर,टर्मनेलिया,महागुनी,बकुळ,हबेबिया,चाफा,बेल व कडूलिंबाचे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सर्व झाडे ८ ते ९ फुटांची लावण्यात आले.

प्रत्येकाने निसर्गाचे रक्षण केले पाहिजे.झाडे लावून झाडांची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे.झाडे आहेत म्हणून आपण आहोत याचे उदाहरण आपल्या सर्वांना कोरोनाच्या काळात मिळाले आहे,तरी प्रत्येकाने वृक्षारोपण करावे असे आव्हान श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पिंपळाचा वाडा खंडाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post