मुंबईत आ.लंके यांची गाडी थांबवण्यात आली... पुढे घडलं असं काही...


मुंबईत खा.सुप्रिया सुळे यांनी केलं आ.लंके यांच्या कामाचे कौतुक
 नगर: कोविड काळात आ.निलेश लंके यांनी चालवलेली रूग्णसेवा राज्यात कौतुकाचा विषय ठरली आहे.  ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही लंके यांचे कौतुक केले. या दरम्यान आता खा.सुप्रिया सुळे यांनीही मुंबईत लंके यांच्या कामाचे कौतुक केले.

लंके यांच्या फेसबुक पेजवर त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या भेटीचा अनुभव शेअर केला आहे.

आज मुंबई मंत्रालयातील काम उरकुन परतीच्या प्रवासाला निघालो होतो,गाडी मरीन ड्राइव्ह च्या दिशेने जात असताना शेजारील गाडीने आम्हाला हात करुन गाडी बाजूला घेण्यास सांगितले आणि त्या गाडीतुन सुखद धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकप्रिय खा.सुप्रिया ताई सुळे गाडीतून उतरत आपुलकिने विचारपुस करत विविध विषय संदर्भात माहिती घेत कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल कौतुक केले. लवकरच सर्व रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स ने मी तुमच्याशी संवाद साधेल असेही ताईंनी तआवर्जून सांगितले.


यावेळी सोबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,माहिती तंत्रज्ञान प्रमुख जितेश सरडे, वनकुटे गावचे सरपंच राहुल जी झावरे, मा.सरपंच अशोक घुले व इतर सहकारी उपस्थित होते.


 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post