लसीकरण नियोजनबद्ध होण्यासाठी आ.जगताप यांची सरकारकडे महत्त्वपूर्ण मागणी

लसीकरण केंद्रांवरच नोंदणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी

आ.संग्राम जगताप यांची राज्य सरकारकडे मागणीनगर:  कोरोना लसीकरणाच्या ऑनलाईन नोंदणीकरता अनेकांकडे फोन उपलब्ध नसल्याने त्यांना नोंदणी करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक जण लसीकरणापासून वंचीत राहत आहेत. त्यामुळे केंद्र शासनाने नोंदणीकरणाबाबत घालुन दिलेल्या नियमावलीत सुधारणा करणे आवश्यक असून त्या नागरिकांना लसीकरण केंद्रावरच नोंदणी करण्याची सुविधा निर्माण करून देण्याची मागणी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वार केली आहे. 


आ. जगताप यांन पत्रात म्हटले आहे, की शासनाने 18 ते 4 वयोगटातील नागरिकांच्या मोफत लसीकरणाचा लोकहिताचा व सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असा लोकप्रिय निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जनमाणसांमध्ये आपल्या नेतृत्त्वाखालील सरकारची प्रतिमा उजळली असून या लसीकरणास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. पण लसीकरण करतेवेळी काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक नागरिक यापासून वंचित राहत आहेत. ही तांत्रिक अडचण आपल्या शासनाची नसून केंद्र शासनाने घालुन दिलेल्या नियमावलीमुळे निर्माण होत आहे. कारण 18 ते 44 या वयोगटातील अनेक नागरिक अशिक्षित असून साधारण कुटुंबातील येतात. अनेकांकडे फोनदेखील उपलब्ध नाहीत. तसेच काहींना फोन हाताळता येत नाही. तसेच ऑनलाईन नोंदणीकरताना अनेकांकडे फोन उपलब्ध नसल्याने त्यांना नोंदणी करता येत नाही. त्यामुळे ते वंचीत राहत आहेत. 


त्यामुळे केंद्र शासनाने नोंदणीकरणाबाबत घालून दिलेल्या नियमावलीत सुधारण करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या नागरिकांना लसीकरण केंद्रावरतीच नोंदणी करण्याची सुविधा निर्माण करून देण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार सरसकट लसीकरण करता येईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post