करोना काळात कर्तव्यात कसूर... मंडलाधिकारी निलंबित

 

करोना काळात कर्तव्यात कसूर... मंडलाधिकारी निलंबितनगर : सुपा येथील मंडळ अधिकारी शिवाजी तुकाराम शिंदे यांच्याकडे मेडिकल ऑक्सिजन टॅकर भरून विनाअडथळा नगरला पोहचविण्याची जबाबदारी होती.

मात्र, करोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी कामात हलगर्जीपणा करत कर्तव्यात कसूर केल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. यासह करोना काळात कामात आणि नियुक्ती दिलेल्या कोविड सेंटरवर हजर न होणार्‍या पाच वैद्यकीय अधिकार्‍यांचे निलंबनाचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी भोसले यांच्या निलंबनाच्या आदेशात पारनेर तहसीलमधील अव्वल कारकून आणि सुपा मंडलाधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार असणार्‍या शिंदे यांच्याकडे करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लिक्विड ऑक्सिजन टँकरवर देखरेखीची जबाबदारी होती. शिंदे यांनी ऑक्सिजनचा टँकर चाकण, तळोजा, मुरबाड येथील उत्पादक युनिटपासून नगर जिल्हा रुग्णालय, रिफीलर प्लॅन्टपर्यंत विनाअडथळा पोहचविण्याची जबाबदारी दिलेली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post