आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे लोहारेतील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित

 

आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे लोहारेतील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वितसंगमनेर:   लोहारे येथील साई गॅस  निर्मित प्रकल्पाला आॅक्सिजन निर्मितीसाठी आवश्यक असलेले  लिक्विड आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी  उपलब्ध करून दिल्याने या प्रकल्पातून आॅक्सिजन निर्मितीला शनिवारी प्रारंभ झाला.यामुळे जिल्ह्य़ातील नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


लोहारे येथे भाऊराव पोकळे यांनी काही दिवसांपूर्वी साई गॅस या नावने प्रकल्प उभा केला.मात्र हा  प्रकल्प सुरू होण्यात  काही प्रशासकीय अडथळे होते.आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणी नासिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागात पाठपुरावा करून हा  प्रकल्प सुरू होण्यातील  सर्व अडथळे दूर केले होते.


सध्या कोव्हीड संकटात आॅक्सिजनची भासणारी टंचाई  दूर व्हावी म्हणून या प्रकल्पाला तातडीने लिक्विड मिळावे यासाठी  आ.विखे पाटील यांनी विशेष पुढाकार घेवून काल टॅकर उपलब्ध करुन दिल्याने या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीला प्रत्यक्ष शनिवार पासून सुरूवात झाली.


  गॅस  निर्मितीसाठी आवश्यक असलेले ९ टन लिक्विड प्राप्त झाल्याने या प्रकल्पातून  एकूण ८०० सिलेंडर आॅक्सिजन निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला.आॅक्सिजन निर्मितीचा शुभारंभ आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, साई गॅसचे प्रवर्तक भाऊसाहेब पोकळे उपस्थित होते.


आॅक्सिजन निर्मितीला सुरुवात झाल्याने याचा  मोठा दिलासा जिल्ह्य़ातील जनतेला मिळेल असा विश्वास आ.विखे पाटील यांनी व्यक्त केला.यासाठी आवश्यक असलेल्या लिक्विडची उपलब्धता सातत्याने व्हावी यासाठी आपला प्रयत्न सुरू राहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


 या प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या पोकळे कुटूंबियांचा आणि आमचा  ॠणानुबंध खूप जुना आहे. भाऊराव यांचे  वडील आणि चूलते हे आमच्याकडे शेती मास्तर म्हणून  कार्यरत आहे.एका शेतकऱ्याच्या मुलाने जिरायती भागात सुरू केलेल्या या प्रकल्पाचे महत्व आजच्या संकटाच्या काळात अधोरेखीत झाले असल्याची प्रतिक्रिया आ.विखे पाटील यांनी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post