दारू महागली, राज्य सरकारने लावला अतिरिक्त 'सेस'

 उत्तर प्रदेशात दारूसाठी मोजावे लागणार जास्त पैसे, अतिरिक्त सेस लागूलखनऊ: उत्तर प्रदेश सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकट असल्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने दारुवर सेस लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तळीरामांना आता दारुवर 10 ते 40 रुपये ज्यादा मोजावे लागणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने अबकारी धोरणात बदल करून हे शुल्क वाढवलं आहे. 

कोविड सेसच्या माध्यमातून सरकारला राज्याचा महसूल वाढवायचा आहे. त्यातून होणाऱ्या मिळकतीचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढण्यास उपयोग होणार आहे. याबाबतचा शासन आदेश कालच सोमवारी जारी करण्यात आला आहे. 

उत्तर प्रदेशात दारुवर कोविड सेस आकारल्या गेल्याने दारुच्या किंमतीत 10 ते 40 रुपयांची वाढ होणार आहे. प्रिमीयम कॅटेगिरीच्या दारुवर प्रति 90ml ला दहा रुपये मोजावे लागणार आहेत. सुपर प्रिमीयमवरील प्रति 90ml वर 20 रुपये आणि स्कॉचवरील प्रति 90 ml वर 30 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याशिवाय इंपोर्टेड दारुवरील प्रति 90ml वर 40 रुपये कोविड सेस आकारला जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post