उधारीच्या पैशावरून तरूणाचा खून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

 उधारीच्या पैशावरून तरूणाचा खून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखलनगर: पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर खांडगाव येथे ३७ वर्षीय तरूणाने दारू पिण्यासाठी उधारीने घेतलेले पैसे परत केले नाही म्हणुन झालेल्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू झाला आहे.

या मारहाणीच्या घटनेत मयत झालेल्या तरूणाचे नाव सुदाम विक्रम गिते (रा. लोहसर खांडगाव) असे आहे. याप्रकरणी दोघांजणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील लोहसर खांडगाव येथील तरुण सुदाम विक्रम गिते (वय ३७, रा. लोहसर खांडगाव) याने दारू पिण्यासाठी उधारीने पैसे घेतले होते.मात्र अनेक दिवसानंतरही सुदाम हा आपले उधारीने घेतलेले पैसे देत नसल्याने आरोपी दत्तात्रय भाऊसाहेब वांढेकर व किरण सखाराम वांढेकर (दोघे रा. लोहसर खांडगाव,ता.पाथर्डी) या दोघांनी सुदाम यास लाथाबुक्क्यांनी पोटात, छातीवर, खांद्यावर जोरात मारहाण केली. या झालेल्या मारहाणीत सुदाम गिते हा मयत झाला.

याबाबत मयत सुदाम याचा भाऊ आदिनाथ विक्रम गिते (वय ४२, रा. लोहसर खांडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय भाऊसाहेब वांढेकर व किरण सखाराम वांढेकर (दोघे रा. लोहसर खांडगाव) यांच्यावर पाथर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post