माजी जि.प.अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी सुरू केले मोफत कोविड केअर सेंटर

 माजी जि.प.अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी सुरू केले मोफत कोविड केअर सेंटरनेवासा:  नगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या पुढाकाराने नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे स्वर्गीय आमदार वकिलराव लंघे पाटील फाउंडेशनच्यावतीने ५० बेड क्षमतेचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन सोमवारी  संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले.

शिरसगाव येथील मातोश्री सुलोचनाबाई वकीलराव लंघे पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या जागेत हे कोविड केअर सेंटर सुरू झाल्याने पंचक्रोशीतील नागरिकांना दिलासा मिळाला असून रुग्णसेवेच्या पुण्याच्या कार्याला सर्वांनी राष्ट्रीय कार्य समजून हातभार लावावा असे आवाहन यावेळी शिवाजी महाराज देशमुख यांनी केले.

याप्रसंगी नवनाथ महाराज मुंगसे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. तेजश्री लंघे, सरपंच छगनराव खंडागळे, माजी सरपंच नवनाथ देशमुख, पंचायत समितीचे सदस्य संजय खरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक डिंबर, डॉ. संजय तावरे, डॉ. कदम, सुनील वाघमारे, वसंत बापू देशमुख, अरुण देशमुख, संतोष काळे, शहाजी गडेकर, दत्तात्रय पोटे, गणेश लंघे, प्रदिप ढोकणे यांच्यासह पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.दत्तात्रय पोटे यांनी सूत्रसंचालन केले तर शिक्षक विठ्ठलराव काळे यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post