आ.बबनराव पाचपुते आक्रमक, सरकारला दिला इशारा

 

कुकडीच्या आवर्तनासाठी आ.बबनराव पाचपुते आक्रमक, सरकारला दिला इशारानगर: कुकडीच्या नियोजित आवर्तनाला खोडा घालण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. पण या स्थगितीमुळे शेती बरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. याला जबाबदार कोण? त्यामुळे राज्य सरकारने दि १२ मे रोजी कोर्टात सक्षम वकिल देवुन ही स्थगिती उठवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आ.बबनराव पाचपुते यांनी दिला आहे.

कुकडीच्या नियोजित ९ मेच्या आवर्तनाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे आवर्तन दि १२ पर्यंत लांबणीवर पडले आहे. आ.बबनराव पाचपुते यांनी म्हटले आहे की, 'कुकडीच्या पाण्याला स्थगिती देणे हे चुकीचे आहे. असे स्थगिती मिळायला लागली तर शेती बरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बननार आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

कोर्टात जाण्याची सवय लागली तर सिंचन होणारच नाही. म्हणुन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेशी दुरध्वनीवरुन चर्चा केली असून दि १२ रोजी सक्षम वकिल देवुन बाजु मांडावी व स्थगिती उठवावी अशी मागणी केली आहे. तसेच जर १२मी ला पाणी सुटले नाही तर तीव्र आंदोलन करु अशा इशारा देखील त्यांनी दिला.

यासंदर्भात कुकडीचे अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ, पारनेरचे आमदार निलेश लंके व कर्जत-जामखेडचे आ.रोहित पवार यांच्या बरोबर चर्चा केली असल्याचे देखील पाचपुते यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post