भाजपचे नगरसेवक संतोष खेतमाळीस यांचे निधन

 

श्रीगोंदा शहरावर शोककळा...भाजपचे नगरसेवक संतोष खेतमाळीस यांचे निधनश्रीगोंदा :  कोरोना विषाणूची लागण झालेले भाजपा नगरसेवक संतोष खेतमाळीस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष खेतमाळीस यांना 12 एप्रिल रोजी कोरोना विषाणूची बाधा झाली होता.19 तारखेला सिटीस्कॅन केल्या नंतर त्यांचा स्कोर 23 आल्याने त्यांना तातडीने नगर येथील विखे पाटील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.संतोष खेतमाळीस यांचे संपूर्ण कुटुंब कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडले होते.त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस यांना व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले होते. आज संतोष खेतमाळीस यांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार होते‌. मात्र अचानक पुन्हा त्रास होवू लागल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटर लावण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली.आमदार बबनराव पाचपुते यांचे अत्यंत विश्वासू म्हणून संतोष खेतमाळीस परिचित होते.

माझे कट्टर कार्यकर्ते, भाजप श्रीगोंदा शहराध्यक्ष, नगरसेवक, सदैव हसतमुख आणि अजातशत्रू  संतोष खेतमाळीस यांना कोरोनाने आपल्यातून नेलं.  संतोष यांच्या जाण्याचं अतीव दुःख मला स्वतःला झालंय.आयुष्यातील कोणत्याही प्रसंगाना हसतखेळत जाणारा आमचा हा सहकारी आता नाही, ही कल्पना करणेही अशक्य आहे. अशा शब्दात आमदार बबनराव पाचपुते यांनी संतोष खेतमाळीस यांना श्रद्धांजली वाहिली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post