केडगाव-अरणगाव रस्त्यासाठी १ कोटींचा निधी: आ.संग्राम जगताप


केडगाव-अरणगाव रस्त्यासाठी १ कोटींचा निधी: आ.संग्राम जगताप नगर - नगर शहर विधानसभा मतदारसंघातील केडगाव-अरणगाव रस्त्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. कामाचे टेंडर निघाल्यानंतर लगेचच प्रत्यक्षात काम सुरू होईल, अशी माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.

केडगाव-अरणगाव रोड हा नगर शहर विधानसभा मतदारसंघात आहे. दळणवळणाच्या दृष्टीने तो महत्वाचा आहे. या रोडच्या कामासाठी निधी मिळावा यासाठी आ. जगताप हे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करत होते. अखेर राज्य शासनाने या रोडसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील ग्रामीण व जिल्हा मार्गासाठी ग्रामविकास विभागाकडून निधी दिला जातो. या धर्तीवर केडगाव-अरणगाव रोडसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post