दरोडा प्रकरणी ४ अटकेत, १५ लाखांच्या सोन्यासह २० लाखांचा मुद्देमाल जप्त

 *माहिजळगाव येथील दरोडा प्रकरणी चौघांना अटक*


*15 लाखांचे सोन्याच्या मुद्देमालासह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त*


*स्थानिक गुन्हे शाखा आणि कर्जत पोलिसांची संयुक्त कारवाई*
कर्जत (आशिष बोरा):-माहिजळगाव येथील चोरीचा तपास लावण्यात कर्जत पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून 15 लाखांचे सोन्याच्या मुद्देमालासह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करत चौघांना अटक करण्यात आली आहे. 

               माहिजळगाव येथील श्रीमती मिना सर्जेराव महारनवर, (वय ५० वर्षे, रा. माही जळगांव), यांच्या घरातुन अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घराचे जिन्यावाटे घरामध्ये प्रवेश करुन फिर्यादी व साक्षीदार यांना मारहान करुन घरातील कपाटामध्ये असलेले सोने, चांदीचे दागिणे, रोख रक्कम असा एकूण ३ लाख ७० हजार रु. किं.चा ऐवज दरोडा टाकत चोरुन नेला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासासाठी 

कर्जत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर याची वेगवेगळी पाच पथके तयार करुन जोरदार हालचाली करण्यात आल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोना सुनिल चव्हाण यांना गुप्त खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा एवन काळे, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला आहे. या माहितीवरुन आरोपींची गोपनिय माहिती घेवून रात्रीचे वेळी सापळा लावून व पाठलाग करुन आरोपी नामे एवन हैवान काळे (वय. ३० वर्षे), मनिषा एवन काळे (वय- ३५ वर्ष), कांचन एवन काळे, सर्व रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड, रेखा जनार्धन काळे, रा.माहिजळगाव, ता. कर्जत, व १ अल्पवयीन यांना ताब्यात घेतले.

               सदर आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागिणे व ईतर चोरीतील सोन्याचे दागिणे असा एकुण ३० तोळे पंधरा लाख रुपये  किमतीचे सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले. तसेच आरोपीच्या घरातुन एक रामपूरी चाकू, लोखंडी कटावनी, ३० हजार रु किमतीचे ३ वेगवेगळ्या कंपण्यांचे मोबाईल हॅन्डसेट, पाच लाख रु. किमतीची स्कापिओ जिप ( एमएच १७-एजे-३५९८) व रोख रक्कम १० हजार ५०० रुपये असा एकूण २० लाख ४० हजार ५०० रु.  किमतीचे सोन्याचे दागिणे, वाहन, मोबाईल व हत्यारे जप्त करण्यात आले आहेत.

            वरील  आरोपीमधील एवन हैवान काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द यापूर्वी अंभोरा पो.स्टे. जि. बीड येथे गुरनं. १५१/२०१७ भादवि कलम ३९५ सह मोक्का कायदा कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

              या कामगिरीत कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, पोहेकॉ प्रबोध हंचे, पांडुरंग भांडवलकर, पोकों सुनिल खैरे, पोकों श्याम जाधव, पोकों महादेव कोहक, पोकों रविंद्र वाघ, पोकों जितेंद्र सरोदे, पोका गणेश आघाव, मपोकॉ कोमल गोफणे, शाहूराज तिकटे यांचे सह स्थानिक गुन्हे शाखेचे  सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, विश्वास बेरड, बबन मखरे, पोना सचिन आडबल, पोहेकॉ सुनिल चव्हाण, पोना सुरेश माळी, पोना विशाल दळवी, पोना दिनेश मोरे, पोना शंकर चौधरी, पोकॉ राहूल सोळंके, सागर ससाणे, रविन्द्र घुंगासे, रणजित जाधव, सागर सुलाने, संदीप चव्हाण, प्रकाश वाघ, आकाश काळे, चालक पोहेकॉ संभाजी कोतकर, चंद्रकांत कूसळकर तसेच पोहेकों अंकुश ढवळे, जामखेड पोलीस ठाण्यातील संग्राम जाधव, अरुण पवार, सचिन राठोड, संदीप राऊत श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील दादासाहेब टाके, किरण बोराडे, गोकुळ इंगवले यांचेसह पोलीस स्टाफ या सर्वानी मिळून एकत्रित प्रयत्नातून या गुन्ह्याचा तपास यशस्वी रित्या लावल्याने सर्वांचे विशेष कौतुक होत आहे.

         सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटिल, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधीकारी अण्णासाहेब जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर व कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी संयुक्तरित्या केली असुन गुन्हयाचा पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशनचे पोसई अमरजित मोरे हे करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post