कर्जतमध्ये कडक जनता कर्फ्यु, विनाकारण फिरणार्यांची जागेवरच करोना चाचणी


कर्जतमध्ये कडक जनता कर्फ्यु, विनाकारण फिरणार्यांची जागेवरच करोना चाचणी कर्जत (प्रतिनिधी):- आजपासून सुरू झालेल्या जनता कर्फ्यु मध्ये कर्जत, मिरजगाव, राशीन, मांदळी आदी ठिकाणी रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.  

               कोरोनाचा कहर वाढत असताना  व दि 3 मे ते 10 मे दरम्यान तालुक्यात जनता कर्फ्यु जाहीर केला आहे, अनेक यामध्ये जीवनावश्यक वस्तूची दुकानेही बंद ठेवण्यात येणार आहेत, त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात असताना अनेक लोक रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत. या लोकांवर प्रशासनाच्या वतीने पोलिस कारवाई करीत असून  कर्जत येथील छ शिवाजी महाराज चौकात (कुळधरण चौकात) पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली नाका बंदी करण्यात आली. याठिकाणी दुचाकीवरून डबलशीट जाणाऱ्या लोकांना उतरवून त्याची कोरोना चाचणी केली जात आहे. आज
 एका दुचाकीवर  जाणाऱ्या 2 व्यक्तींपैकी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे याच पद्धतीने राशीन, मिरजगाव, मांदळी या ठिकाणी ही कारवाई केली जात असून नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे, पत्रकार सुभाष माळवे व पोलीस कर्मचारी व नगर पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post