दिग्गज अभिनेता कमल हासन विधानसभेच्या आखाड्यात पराभूत

 

दिग्गज अभिनेता कमल हासन विधानसभेच्या आखाड्यात पराभूतअभिनेता-राजकारणी कमल हासन यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा वानती श्रीनिवासन यांनी हासन यांना पराभूत केले. कोयंबतूर दक्षिण जागेवर राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. शेवटी भाजपने येथे आपला विजय नोंदविला आहे. दरम्यान, तमिळनाडूमध्ये संत्तातर झाले असून आता डीएके युती सत्तेत आली आहे.


तामिळनाडूमध्ये आता स्टॅलिन युग सुरू झाले आहे. राज्यात द्रविड राजकारणाचा सर्वात मोठा नायक म्हणून एमके स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील डीएके युती तमिळनाडूमध्ये पुढचे सरकार स्थापन करणार आहे. राज्यात पहिल्यादाच राजकारणातील दोन मोठे नेते जयललिता आणि एम. करुणानिधीविना लढल्या गेलेल्या या निवडणुकीत एआयएडीएमकेला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post