दोघांवर हल्ला करणारा बिबट्या मृतावस्थेत आढळला, पारनेर तालुक्यातील घटना

 

दोघांवर हल्ला करणारा बिबट्या मृतावस्थेत आढळला, पारनेर तालुक्यातील घटना



नगर: पारनेर तालुक्यातील कळस येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर हल्ला केल्यानंतर काही तासांनी बिबट्याचा मृत्यू झाला आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून मृत बिबट्याचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. 

पारनेर तालुक्यातील कळस गावातील मेंढे मळ्यातील पोपट येवले (वय 72), सुदर्शन घाडगे (वय 30) या शेतकर्‍यांवर 18 तारखेला बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. दोघेही ही संध्याकाळी सातच्या सुमारास शेतातील कामे आटोपून घरी जात असताना हा हल्ला झाला.  त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 

 19 तारखेला तेथील शेतकर्‍यांना बिबट्या शेतात निपचित पडला असल्याचे दिसले. त्यांनी याबाबत वनविभागाच्या अधिकार्‍यांना कळवले. 

वनविभागाचे अधिकारी पथकासह घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला आहे. तसेच बिबट्याचे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक अहमदनगर एस. एस. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा गोरे, वनपाल नाना जाधव, संदीप भोसले एस. एस. जाधव, छबु रोडे, वनरक्षक हरी आठरे,उमेश खराडे, गजानन वाघमारे व आदी वनमजूर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post