आमदार रोहित पवार 'झिंगाट'वर थिरकले आणि रूग्णांचे चेहरे फुलले...पहा Video

 आमदार रोहित पवार 'झिंगाट'वर थिरकले आणि रूग्णांचे चेहरे फुललेजामखेड : कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोव्हीड केअर सेंटरला आ. रोहित पवार यांनी आज सोमवारी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रुग्णांचे मनोबल वाढावे तसेच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. रोहित पवार हे रुग्णांच्या चेह-यावरील निराशा दूर करण्यासाठी रुग्णांसोबत सहभागी होत झिंगाट गाण्यावर थिरकले . हे पाहून रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद दिसुन आला .


प्रतिनिधी नासीर पठाण सह कॅमेरामन अशोक वीर कर्जत जामखेड .

Video0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post