पुरोगामी महाराष्ट्रात लाजीरवाणी घटना...जात पंचायतीकडून महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा

 पुरोगामी महाराष्ट्रात लाजीरवाणी घटना...जात पंचायतीकडून महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षामुंबई: अकोल्यात जात पंचायतीने एका महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे. त्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन देऊन ही मागणी करतानाच या घटनेची माहितीही दिली आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथील वडगाव येथे ही घटना घडली आहे. पीडीत महिला जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील रहिवासी आहे. पीडित महिलेने साईनाथ नागो बाबर यांच्याशी 2011 साली विवाह केला होता. पतीच्या जाचाला कंटाळून तिने 2015 मध्ये न्यायालयातून रितसर घटस्फोट घेतला. पीडीत महिलेने न्यायालयात जाणे तिच्या  जात पंचायतच्या पंचांना मान्य नव्हते. त्यांनी हा घटस्फोट धुडकावून लावला. दरम्यान पीडीत महिलेने 2019 मध्ये अनिल जगन बोडखे या घटस्फोटीत व्यक्तीशी पुनर्विवाह केला. असा पुनर्विवाह पंचांनी अमान्य केला व जात पंचायतने तिला 1 लाख रुपयांचा दंड केला. महाराष्ट्रातील पंचांनी एकत्र येऊन न्यायनिवाडा करत दारू मटण खाल्ले व पीडीत परिवारास जात बहिष्कृत केले. पीडीत महिलेने पहिल्या नवर्‍या सोबत रहावे, असा पंचांनी हेका कायम ठेवला. तसेच पंचांनी केळीच्या पानावर थुंकायचे व त्या महिलेने ते चाटायचे अशी शिक्षा पीडित महिलेला देऊन विकृतीचे दर्शन घडविले. अशा घटनांना सातत्याने घडत असल्याने कठोरपणे कार्यवाही आणि जातपंचायत कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे, असं नीलम गोऱ्हे यांनी निवेदनात म्हटलं आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post