पत्नी महापौर तर पती विरोधी पक्ष नेते, 'या' महापालिकेत शिवसेनेचं अनोखं राजकारण


पत्नी महापौर तर पती विरोधी पक्ष नेते, जळगाव महापालिकेत अनोखं राजकारण जळगाव : जळगाव महापालिकेत सध्या अनोख्या राजकारणाचं दर्शन बघायला मिळतंय. महापालिकेवर सध्या महाविकास आघाडी पूरस्कृत शिवसेनेची सत्ता आहे. महापालिकेच्या महापौर या शिवसेनेच्या जयश्री महाजन या आहेत. तर त्यांचे पती सुनील महाजन हे महापालिकेत विरोधी पक्षनेते आहेत. विशेष म्हणजे दोघं शिवसेनेतर्फे निवडून आले आहेत. आताही ते शिवसेनेतच आहेत. पण पत्नी शिवसेनेची महापौर तर पती शिवसेनेचाच विरोधी पक्षनेता आहे.

जळगाव महापालिकेत नुकतेच सत्तांतर झाल. शिवसेनेने भाजपचे नगरसेवक फोडून सत्ता मिळवली. त्यानंतर शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी विराजमान झाल्या. त्यावेळी महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे होते. महाजन यांचे पती सुनील महाजन विरोधी पक्ष नेते होते ते आजही आहेत. त्यामुळे एकाच घरात महापालिकेतील महापौर आणि विरोधी पक्ष नेता ही दोन्ही पदे आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post