पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीची गळफास घेऊन आत्महत्या, ४ महिन्यांपूर्वीच झाला होता थाटामाटात विवाह

 पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीची गळफास घेऊन आत्महत्या,  ४ महिन्यांपूर्वीच झाला होता थाटामाटात विवाह




जामखेड -  शहरातील बीड रोड शेजारी रहाणार्‍या शिल्पा अजय जाधव वय २८ हीने दुपारी आपल्या रहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तीचा पती अजय कचरदास जाधव वय ३२ यास माहीत झाल्यानंतर त्याने देखील दुसर्‍या ठीकाणी काही तासातच गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांनी एकच दिवशी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 


या बाबत समजलेली माहिती अशी की अजय व शिल्पा या दोघांचा नुकताच चार महीन्यांपुर्वी मोठ्या थाटात विवाह सोहळा संपन्न झाला होता. आज बुधवार दि १२ रोजी दुपारी शिल्पा अजय जाधव वय २८ वर्षे हीने बीड रोड जवळील आदित्य गार्डन शेजारी रहात आसलेल्या घरी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत ची माहीती तीचा पती अजय कचरदास जाधव वय ३२ वर्षे यास माहीत झाली या नंतर त्याने देखील मोरे वस्ती येथील त्याच्या पाण्याच्या जारप्लांट मधिल अॉफीस मध्ये काही वेळातच गळफास आत्महत्या केली. पती पत्नी यांनी आत्महत्या का केली या बाबत अद्याप काही समजु शकले नाही. अजय याने आत्महत्या करण्याच्या पुर्वी लिहुन ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की माझ्या आत्महत्यास मी जबाबदार असुन कोणासही दोषी ठरवू नये असे म्हटले आहे. यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले असुन या प्रकरणी मयताचा भाऊ अभिषेक कच्चरदास जाधव याने जामखेड पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. अजय याचा मोठा मित्रपरिवार होता अशा दोघा पती पत्नी च्या आत्महत्याने मित्रपरिवारांनमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी नासीर पठाण सह कॅमेरामन अशोक वीर जाम खेड .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post