ब्रेकिंग.....करोनाचा फटका....'आयपीएल'चे उर्वरित सामने रद्द

 

करोनाचा फटका.... आयपीएलचे उर्वरित सामने रद्दनवी दिल्ली: देशभर कोरोनाचा उद्रेक होत असताना आता आयपीएललाही कोरोनाने गाठल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुरु असलेली आयपीएल 2021 ची स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली. 

देशभर कोरोनाचा उद्रेक होत असूनही आयपीएलच्या स्पर्धा सुरुच होत्या. खेळाडूंसाठी बायो बबलचे नियम होते. मात्र तरीही खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे कालचा RCB विरुद्ध KKR हा सामना रद्द झाला होता.त्यानंतर आज दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे IPL ची स्पर्धा आता रद्द करण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post