रेमडेसिवीर इंजेक्शनची बेकायदा विक्री, चौघांना अटक, ११ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

 

रेमडेसिवीर इंजेक्शनची बेकायदा विक्री, चौघांना अटक, ११ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्तनगर : औरंगाबाद  महामार्गावरील वडाळाबहिरोबा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री रॅकेटवर छापा टाकून चार जणांस अटक केली. या गुन्ह्यात वापरलेली वाहने, मोबाईल व इंजेक्शन असा 11 लाख 70 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

करोना उपचारासाठी आवश्यक असलेले विनापरवाना रेमडेसिवीर इंजेक्शन वडाळाबहिरोबा येथे विकले जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना समजल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, कर्मचारी सुरेश माळी, संतोष लोंढे, लक्ष्मण खोकले, दीपक शिंदे, रवींद्र घुंगासे, मेघराज कोल्हे, प्रकाश वाघ, योगेश सातपुते, उमाकांत गावडे व पथकाने पंचांसह छापा टाकून चार जणांस अटक केली आहे.

अन्न व औषध प्रशासनचे निरीक्षक अशोक तुकाराम राठोड यांच्या फिर्यादीवरुन कोवीड 19 साथ आजारचा फायदा घेण्याच्या उद्देशाने औषध किंमत नियंत्रण आदेश 2013, कलम 3(2) भा.द.वी 420, 34 नुसार रामहरी बाळासाहेब घोडेचोर, (वय 22) रा.देवसडे ता.नेवासा, आनंद पुंजाराम थोटे (वय28) (रा.भातकुडगाव ता.शेवगाव), पंकज गोरक्षनाथ खरड (वय 29) (रा.देवटाकळी ता.शेवगाव) व सागर तुकाराम हंडे (वय 30)(रा.खरवंडी ता.नेवासा) या चौघास अटक करण्यात आली असून एक आरोपी पसार झाला आहे.

कारवाईत एक कार, एक मोटारसायकल, मोबाईल, रेमडेसिवीर इंजेक्शन असा 11 लाख 70 हजाराचा ऐवज जप्त केला आहे. शनिशिंगणापुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल अधिक तपास करत आहेत.

पंचांनी संबंधित व्यक्तीस मोबाईलवर संपर्क करुन रेमडेसिवीर इंजेक्शन बाबत विचारणा केली असता एका इंजेक्शनची किंमत 35 हजार रुपये सांगण्यात येवून वडाळा येथील हॉटेल समाधान समोर येण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पथकाने सापळा रचून चार जणास अटक केली. एक आरोपी पसार झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post