रामदेव बाबांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा ॲलोपॅथी उपचार पद्धती बंद करावी

 

रामदेव बाबांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा ॲलोपॅथी उपचार पद्धती बंद करावी

आय. एम. ए‌. ची केंद्र सरकारकडे मागणीनवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात योगगुरु रामदेव बाबा यांच्या एका वक्तव्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा यांनी कोरोनावरील एलोपॅथी उपचार पद्धतीबाबत अविश्वासार्हता दर्शवली आहे. त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने आक्रमक भूमिका घेतलीय. रामदेव बाबा यांच्यावर कारवाई कठोर कारवाई करण्याची मागणी IMAने केली आहे. कोविड उपचार पद्धतीमध्ये फॅबीफ्लू आणि स्टेरॉईड्ससह अन्य अँन्टिबायोटिकही फोल ठरल्याचं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलं आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

रामदेव बाबा यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या IMA ने थेट केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडेच दाद मागितली आहे. “केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी एक तर हा आरोप स्वीकार करावा आणि आधुनिक उपचार पद्धती बंद करावी. नाहीतर मग रामदेव बाबा यांच्याविरोधात कारवाई करुन साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी IMA ने केली आहे. देशत कोरोना महामारीचा सामना करतोय. आधुनिक उपचार पद्धती आणि भारत सरकार मिळून लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संकटाच्या काळात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या 1 हजार 200 एलोपॅथी डॉक्टरांनी बलिदान दिलंय, असंही IMA ने आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटलंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post