कोविड रुग्णांवर विनापरवाना उपचार करणार्या 'या' क्लिनिकवर कारवाई

 

पारनेरमध्ये विनापरवाना कोविड रुग्णांवर उपचार करणार्या क्लिनिकवर कारवाईनगर: कोविड सेंटर उभारणी व कोविड रुग्णांवर उपचारांसाठी विहित परवानगी आवश्यक असताना पारनेर शहरात विनापरवाना कोविड रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.करोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठीची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता करोना रूग्णांवर उपचार करणार्या एका क्लिनीकवर कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी ही कारवाई केली असून गांधी क्लिनिक असे कारवाई केलेल्या हॉस्पीटलचे नाव आहे. तहसीलदार देवरे, पारनेर नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सुनिता कुमावत, गटविकास अधिकारी किशोर माने, पोलिस निरीक्षक घनशाम बळप आणि तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे ठिकठिकाणी भेटी देवून तपासणी करत आहेत. यात  गांधी क्लिनिक येथे करोनाबाधितांसाठी 20 बेड तयार करून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे निर्दशनास आले.


तहसिलदार देवरे यांनी तेथे उपचार घेत असलेल्या रूग्णांशी संवाद साधला असता सर्व रूग्ण करोनाबाधित असल्याचे निर्दशनास आले. डॉ. गांधी यांनी अशा रूग्णांची माहिती प्रशासनाला देणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी कोणतीही माहिती प्रशासनाला दिली नाही. डॉ. गांधी यांच्याकडे उपचार घेत असलेल्या सर्व रूग्णांना पुढील उपचारासाठी भाळवणी येथील कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. डॉ. गांधी यांनी अनधिकृतरित्या कोविड रूग्णांवर उपचार केल्याने व त्या रूग्णांची माहिती प्रशासनाला न दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. यासंबंधीचा अहवाल पोलिस निरीक्षक बळप यांच्याकडे देण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post