हनीट्रॅप प्रकरण....तरूणीसह दोघांना दुसर्या गुन्ह्यात वर्ग करणार, इतर दोघे जण अजूनही फरार

 हनीट्रॅप प्रकरण....तरूणीसह दोघांना दुसर्या गुन्ह्यात वर्ग करणार, इतर दोघे जण अजूनही फरारनगर: नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हनीट्रॅपमधील आरोपी सचिन भिमराज खेसे व बापू बन्सी सोनवणे यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. तर या गुन्ह्यातील आरोपी तरूणी व एजंट अमोल सुरेश मोरे यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. दरम्यान तरूणी व मोरे यांना न्यायालयाच्या आदेशानंतर दुसर्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यात येईल, अशी माहिती तपासी अधिकारी सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली.

हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या नगर तालुक्यातील बागतदाराने फिर्याद दिल्यानंतर संबंधीत तरूणीसह एजंट मोरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर याच गुन्ह्यात सहभाग असलेला बापू सोनवणेला पोलिसांनी अटक केली होती. या सर्वांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपत असल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने तरूणी व मोरे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून सोनवणे याला दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

हनीट्रॅपमध्ये गुंतलेले एक क्लासवन अधिकारी यांनी फिर्याद दिल्यानंतर यामध्ये संबंधीत तरूणीसह एजंट मोरे, सचिन खेसे, महेश बागले, सागर खरमाळे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी खरमाळे व बागले अद्याप पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post