अश्लील व्हिडिओ बनवत एक कोटींच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल करण्याचा उद्योग, महिलेसह दोघांना अटक


अश्लील व्हिडिओ बनवत एक कोटींच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल करण्याचा उद्योग, महिलेसह दोघांना अटकनगर : - शारीरिक संबंधाचे अश्लील व्हिडिओ बनवून एक कोटीची खंडणी मागत एकाला लाखोंचा गंडा घालणाऱ्या महिलेसह दोघांना नगर पोलिसांनी अटक केली आहे ‌‌.   महिलेन कायनेटिक चौकातील किराणा दुकानदार असलेल्या एजंटामार्फत फिर्यादीला मारहाण करत त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोकड असा 5 लाखांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला. त्यानंतर पोलिसांत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करून 1 कोटी रुपयांची मागणी केली. फिर्यादीने पोलिसात धाव घेतल्याने या हनी ट्रॅपचा पर्दाफाश झाला.

नगर तालुक्यातील जखणगावातील महिला व नगर शहरातील कायनेटिक चौकातील किराणा दुकानदार अशा दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.  या तरुणीने फिर्यादीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 26 एप्रिल रोजी त्यांच्यात शरीरसंबंध आले. त्याचवेळी नगरमधील कायनेटिक चौकातील दुकानदाराने त्या प्रसंगाचे व्हिडीओ चित्रण केले. नंतर संबंधिताला मारहाण करत त्याच्या अंगावरील 5 तोळ्याची सोन्याची चेन, साडेसहा तोळ्याच्या 4 अंगठ्या आणि 84 हजार रुपयांची रोकड असा साडेपाच लाख रुपयांचा ऐवज मारहाण करत बळजबरीने काढून घेतला.

पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी गुन्ह्याचे गांर्भीय लक्षात घेऊन नगर तालुक्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेद्र सानप यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपविली. सानप यांच्या पथकाने आज सकाळीच जखणगावातील तरुणीला ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने कायनेटिक चौकातील किराणा दुकानदाराचाही यात सहभाग असल्याची कबुली दिली.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post