राज्यात प्रथमच नगरमध्ये 'यांच्या' लसीकरणासाठी स्वतंत्र केंद्र..

 राज्यात प्रथमच नगरमध्ये हमाल-मापाडी यांचे स्वतंत्र लसीकरण केंद्र

कोरोना रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे पाऊल - आ.संग्राम जगतापनगर - कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना रुग्णांना सर्व सोयी-सुविधा मिळवून देण्याबरोबरच कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हे महत्वाचे पाऊल ठरत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी उपलब्ध लसीचे नियोजन करुन फ्रंटलाईन वर्कर यांना प्राधान्य दिले जात आहेत. हमाल-मापाडी हेही एकप्रकारे फ्रंटलाईन वर्कर आहेत.  राज्यात प्रथमच हमाल-मापाडी यांचे विशेष केंद्रातून लसीकरण होत आहे.  हमाल-मापाडी यांचे लसीकरण व्हावे, यासाठी हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी माझ्याकडे, शासनाकडे, मनपाकडे अशा विविध स्तरावर पाठपुरावा केला होता; आज त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन लसीकरण होत आहे. हमालांनीही लसीकरण करुन घेऊन आपली व  कुटूंबियांची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
हमाल-मापाडी कामगारांसाठी राज्यातील पहिल्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ नगरमध्ये जिल्हा हमाल पंचायत येथे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक  कामगार आयुक्ता चंद्रकांत राऊत, हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, विष्णूपंत म्हस्के, हनुमंत कातोरे, डॉ. विजय कवळे, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकान, संजय महापुरे, आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, माथाडी मंडळाचे निरिक्षक सुनिल देवकर, नारायण गीते, संदिप  भागाडे, भाऊसाहेब वाबळे,अनुरथ कदम, बहिरु कोतकर आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post