हमाल माथाडी कामगारांचे कोरोना लसीकरण करा, अन्यथा काम बंद...

 हमाल माथाडी कामगारांचे कोरोना लसीकरण सुरु करा अन्यथा काम बंद आंदोलन

 पालकमंत्र्यांना निवेदन देऊन हमाल पंचायत समितीचा इशाराअहमदनगर प्रतिनिधी- हमाल माथाडी कामगार हा शेतकरी व व्यापाऱ्यांचा महत्त्वाचा दुवा आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील विविध बाजार समितीमध्ये भाजीपाला,कांदा,भुसार मार्केट, रेल्वे मालधक्का,वखार महामंडळ, एफसीआय, किराणा बाजार, ट्रान्सपोर्ट, शासकीय धान्य गोदामे, विविध कारखाने आदीसह अत्यावश्यक सेवा म्हणून अहमदनगर माथाडी महामंडळ नोंदणी असणारे सुमारे सहा हजार कामगार नियमा प्रमाणे काम करत आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेली वर्षभरापासून हमाल माथाडी कामगार जोखीम पत्कारून काम करत आहे.अनके कामगार व कुटुंबीय कोरोना बाधित झाले आहे त्यामधील काहींचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तरी जिल्ह्यातील हमाल माथाडी कामगारांना कोरोना प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. यासाठी नगर शहरामध्ये हमाल पंचायतीचा दावखाना असून या ठिकाणी ताबडतोप लसीकरण केंद्र सुरू करावे त्याच बरोबर जिल्ह्यातही लसीकरण केंद्र हमाल माथाडी कामगारांसाठी सुरू करावे अन्यथा येत्या आठ दिवसांमध्ये लसीकरण केंद्र सुरू न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा पालक मंत्री हसन मुश्रीफ यांना अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले,माजी आ. चंद्रशेखर घुले उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post