पाणलोट विकासामुळे नगर तालुक्यातील 'हे' गाव स्वयंपूर्णतेकडे

 *पाणलोट विकासामुळे गुंडेगावची वाटचाल स्वयंपूर्णतेकडे : बाळासाहेब हराळ* नगर  : तालुक्यातील ‌गुंडेगाव येथे कृषी विभागांतर्गत गतीमान पाणलोट विकास कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती  बाळासाहेब हराळ  यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी श्री टकले साहेब,  पर्यवेक्षक श्री नारायण करांडे उपस्थित होते.

       गुंडेगाव परिसरातील कोळगाव रोड,  धावडे वाडी,  हराळ मळा,  माने मळा,  नगर रोड याठिकाणी शेताची बांधबंदिस्ती करणे, माती नाला बांध दुरुस्त करणे,  डीप सी सी टी खोदकाम करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. गावामध्ये मागील जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत राहिलेल्या कामांचे संपूर्ण नियोजन करून संबंधित कामाचे आराखडे  दोन वर्षापूर्वी पासून  बनविण्यात येत होते. त्यानुसार कृषी विभागामार्फत गतीमान पाणलोट विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत  संबंधित कामांचा समावेश करून मंजुरी घेण्यात आली. पाणलोट क्षेत्र अंतर्गत अजूनही राहिलेल्या कामांचे नियोजन करून ती कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा मानस बाळासाहेब हराळ  यांनी व्यक्त केला.    

       याप्रसंगी गुंडेगावच्या  सरपंच सौ मंगल ताई सकट, उपसरपंच संतोष भापकर,  आदर्श  सरपंच संजय कोतकर,  सुनील भापकर सोसायटीचे माजी चेअरमन वामनराव जाधव, बबनराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदीप जाधव, नानासाहेब हराळ,  संतोष धावडे भाऊसाहेब हराळ,  पोपटराव हराळ,  किरण कोतकर,  राजेंद्र मोहिते, दिलीप धावडे लाला भाई शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post