नियमित गोमूत्र पिल्याने करोना दूरच राहतो, भाजपच्या खा.प्रज्ञासिंह यांचा दावा

नियमित गोमूत्र पिल्याने करोना दूरच राहतो, भाजपच्या खा.प्रज्ञासिंह ठाकूर यांचा दावा नेहमीच आपल्या विधानांवरून चर्चेत असणाऱ्या भाजपाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या पुन्हा एकदा नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. कोविडमुळे होणारा फुफ्फुसातील संसर्ग गोमूत्र प्यायल्याने बरा होऊ शकतो, असे भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे. गोमूत्र प्यायल्याने करोनासुद्धा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी स्वतःचे उदाहरण देत आपण रोज गोमूत्र पीत असल्याने करोना झाला नसल्याचे सांगितले. एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी व्हिडिओमध्ये गोमूत्र प्यायल्याने करोना होत नसल्याचे म्हटले आहे. “देशी गायीचे गोमूत्र आपण प्यायलो तर फुफ्फुसाचा संसर्ग होत नाही. मला खूप त्रास होतो. पण मी रोज गोमूत्र पिते. यामुळेच करोनासाठी कोणतेही औषधे घ्यायची गरज लागत नाही. मला करोनाही झाला नाही”,  असे प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post