शेतकऱ्यांना मोबदला न देता गॅस पाईपलाईनचे काम, माजी आमदार राहुल जगताप लढा उभारणार


शेतकऱ्यांना मोबदला न देता गॅस पाईपलाईनचे काम, माजी आमदार राहुल जगताप लढा उभारणार नगर- श्रीगोंदा -देऊळगाव -भानगाव- ढोरजे-कोथुळ-कोळगाव-चिखली- मार्गे खडकी पर्यंत जाणार्या (BGRL)बीजीआरएल या गॅस पाईप लाईनमध्ये नुकसान होणाऱ्या शेतकर्‍यांच्या जमिनीचे भूसंपादन करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी लढा उभा करणार असे माजी आमदार तथा विद्यमान जिल्हा बँक संचालक राहुल जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हंटले आहे.

शहरात येणारी बंद पाईपलाईन मधून गॅसची पाईपलाईनचे तालुक्यामध्ये गॅस पाईपलाईनचे काम चालू आहे, सदर कामाचा ठेकेदाराने कुठलीही परवा न करता शेतकर्‍यांच्या शेतीमधून जवळपास 1.5 मीटर रुंद व 2 मिटर खोलीचा चर घेत आहेत. यामध्ये कसल्याही प्रकारचे भूसंपादन झालेले नाही. तसेच कसल्याही प्रकारची नुसकान भरपाई ठेकेदार देत नाही. ठेकेदार बळाच्या जोरावर काम करत आहे. सदर ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून वरील गावातील त्रस्त शेतकऱ्यांनी माजी आमदार राहुल जगताप यांची भेट घेऊन व्यथा सांगितली.

त्यावेळी बोलताना राहुल जगताप यांनी सदर पाईपलाईन मध्ये जाणारे क्षेत्र ,घरे ,जनावांचे गोठे, फळझाडे, पिके इत्यादी बाबत जिल्हाधिकारी यांचेमार्फत रीतसर भूसंपादन करणे तसेच शेतकर्‍यांचे होणारी नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी लढा उभा करणार असल्याचे सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post