माळरानावरील‌ शेतात गांजा लागवड, साडेपाच लाखांचा गांजा जप्त

 माळरानावरील‌ शेतात गांजा लागवड, साडेपाच लाखांचा गांजा जप्तनगर- श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण शिवारात शेतामध्ये गांजा पिकविणार्‍या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. रामदास गेणु रायकर (रा. मांडवगण ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पाच लाख 40 हजार रूपये किंमतीचा 54 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीस शिपाई किरण बोराडे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात एनडीपीएस अ‍ॅक्ट 1885 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

गावापासून दूर अंतरावर माळरानावरील शेतामध्ये रामदास रायकर याने गांजाची झाडे लावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली होती. त्यांनी शनिवारी पथकासह रायकर याच्या शेतामध्ये छापा टाकला. यावेळी संपूर्ण शेतामध्ये लहान मोठी 110 गांजाची झाडे पोलिसांना मिळून आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post