मोदींनी करोना परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी नितीन गडकरींकडे द्यावी


मोदींनी करोना परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी नितीन गडकरींकडे द्यावी 

भाजपचे खासदार सुब्रमण्यम यांची मागणी



 नवी दिल्ली: देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. रोज साडेतीन लाखांहून अधिक नवे रुग्ण देशात आढळून येत आहेत. करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. असं असतानाच आता थेट भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्राला घरचा आहेर दिलाय. पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या करोना माहमारीच्या काळामध्ये काहीच कामाचं नसून सध्याची करोना परिस्थिती हाताळणची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी स्वामी यांनी केलीय. स्वामी यांनी सध्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन हे खूपच नम्र असून त्यांना त्यांच्या खात्याचं काम मोकळेपणाने करु दिलं जात नसल्याचं म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post