करोना काळात राजकारण नको, सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावलेच पाहिजेत असं नाही

 

सगळ्याच  गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावलेच पाहिजेत असं नाही, गडकरींनी घेतली स्वपक्षाच्या नेत्यांची शाळानागपूर : कोरोनावरून सुरु असलेल्या राजकारणावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप नेत्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावलेच पाहिजेत असं नाही.  अशा वेळेत राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही. तुम्ही केलेल्या सेवा कामाचा फार बागुलबुवा करु नका, अशा शब्दात गडकरींनी कान टोचले आहेत. नागपूरमध्ये भाजपच्या झालेल्या बैठकीत त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते. 


यावेळी गडकरी म्हणाले की, कोरोना काळात राजकारण करु नका. सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावलेच पाहिजेत असं नाही.  अशा वेळेत राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही. तुम्ही केलेल्या सेवा कामाचा फार बागुलबुवा करु नका, असं ते म्हणाले. गडकरी म्हणाले की, एकाच ऑक्सिजन सिलेंडरसोबत चार जण फोटो काढतात. हे चांगले नाही. त्यातून आपल्याबद्दलचा दृष्टिकोन बदलतो. राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही. समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण म्हणजे राजकारण आहे, असंही गडकरी यावेळी म्हणाले. 


यावेळी गडकरी म्हणाले की, नुसत्या निवडणुका लढवणे आणि सत्तेत जाणे एवढाच त्याचा भाग  नाही. यावेळी गरीबांच्या मागे, समाजामागे धर्म, पक्ष विसरुन मदत करा. त्याचे फळ पक्षाला नक्कीच मिळतं. वाईट काळात कार्यकर्त्यांच्या मागे राहिलो तर ते कधी विसरत नाहीत. राजकीय दृष्ट्या विरोधक असले तरी सगळ्यांच्या मागे उभे राहणे सामाजिक दायित्व आहे. मला कोरोना होत नाही असं म्हणून काहीजण गाफिल राहतात. आजही अनेक नगरसेवक, कार्यकर्ते बेफिकिरपणे फिरत असतात, असं ते म्हणाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post