नगरसेवक योगीराज गाडे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून दिली नागरिकांना सेवा

 नगरसेवक योगीराज गाडे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून दिली नागरिकांना सेवा



नगर : करोना काळात आरोग्य कर्मचारी स्वताच्या जीवावर उदार होऊन लोकांना सेवा देत आहेत. लसीकरण केंद्रांवर दररोज नागरिकांचे व्यवस्थित लसीकरण होईल यासाठी ते झटत असतात. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अतिशय धावपळीच्या कामाचा अनुभव आज शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांनी घेतला. गाडे यांनी फेसबुक पोस्ट द्वारे हा अनुभव शेअर करीत आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.


नगरसेवक योगीराज गाडे यांनी लिहिले की,

आज मनपा लसीकरण केंद्रात काही तास सेवा करण्याची संधी मिळाली . अधिकृत पणे ज्या नागिरकांना लस मिळाली , त्यांचे ऑनलाइन नोंदणी करण्याची भाग्य मला मिळाले. हेल्थ-केयर कर्मचारी खरंच आपल्या साठी खुप कष्ट करत आहेत. त्यांना सलाम. रोज ते आपलं जीव धोक्यात घालून न चुकता लसीकरण केंद्रात येतात आणि आपणस नागिरकांना लस मिळून देतात . हेल्थकेयर  कर्मचाऱ्यांचे आभार देखील मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post