नगर जिल्ह्यासाठी युरिया खताचा पुरेसा साठा लवकर मिळावा

नगर जिल्ह्यासाठी युरिया खताचा पुरेसा साठा लवकर मिळावा

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची कृषीमंत्री भुसे यांच्याशी चर्चामुंबई:  यावर्षी भरपूर पाऊस होणार असल्याचे अपेक्षित आहे नेवासा तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खरीप पिकाची पेरणी व लागवड होणार आहे

त्यामुळे खरीप पिकासाठी मोठ्याप्रमाणावर युरिया खताची मागणी असणार आहे ही संभाव्य मागणी लक्षात घेता जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज मुंबई येथे राज्याचे कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांची भेट घेऊन नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्याला खरीप पिकासाठी लागत असलेल्या युरिया खताचा साठा वेळेवर उपलब्ध करून शेतकरी बांधवांना सहकार्य करावे याबाबत चर्चा केली.

त्यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन युरिया खतांच्या पुरवठा करण्याबाबत सांगितले त्यामुळे नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्याला युरिया खताचा पुरवठा होऊन खताची टंचाई दूर होण्यास मदत होईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post