शहरात फिरत्या दवाखान्याद्वारे ॲंटीजेन चाचणी, मनपा व 'बीजेएस'चा संयुक्त उपक्रम

 मनपा व भारतीय जैन संघटना विद्यमाने शहरामध्‍ये फिरत्‍या दवाखान्‍या मार्फत मोफत अन्‍टीजन तपासणी

अन्‍टीजन तपासणी मुळे कोरोना रूग्‍ण संख्‍या कमी होण्‍यास मदत होईल.  आ.संग्राम जगताप

 


नगर -   कोरोना संसर्ग विषाणूची साखळी तोडण्‍यासाठी अहमदनगर महानगरपालिकेच्‍या वतीने शहरामध्‍ये विविध ठिकाणी अन्‍टीजन तपासणी आरटीफिशीआर तपासणीचे केंद्र सुरू आहे. मात्र नागरिकांवर करोनाचे उपचार ताबडतोब होण्‍यासाठी मनपा व भारतीय जनसंघटनेच्‍या वतीने फिरत्‍या दवाखान्‍यामार्फत मोफत अन्‍टीजन तपासणी करण्‍यात येणार आहे.  नगरसेवक मा.श्री.कुमारसिंह वाकळे, यांच्‍या प्रयत्‍नातून आज प्रभाग क्रमांक 7 मधील बोल्‍हेगांव आरोग्‍यापासून अन्‍टीजन तपासणीला सुरूवात झाली असून सर्वत्र शहरभर तपासणी करून कोरोना रूग्‍ण संख्‍या कमी करण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत.  यासाठी नगर शहरातील नागरिकांनी कोरोनाची लक्षणे आढळल्‍यास किंवा कोरोना पॉझिटिव्‍ह रूग्‍णांच्‍या संपर्कात आल्‍यास आपली अन्‍टीजन तपासणी करून घ्‍यावी व कोरोनाची साखळी तोडण्‍यास सहकार्य करावे असे मत मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांनी व्‍यक्‍त केले.

      नगरसेवक मा.श्री.कुमारसिंह वाकळे यांच्‍या प्रयत्‍नातून प्रभाग क्र. 7 मधील बोल्‍हेगांव येथे  मनपा व भारतीय जैन संघटनेच्‍या वतीने फिरत्‍या दवाखान्‍या मार्फत मोफत अन्‍टीजन तपासणी कार्यक्रमाचा शुभारंभ मा.आ.श्री.संग्रामभैय्या जगताप यांच्‍या हस्‍ते झाला. यावेळी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे, आयुक्‍त मा.श्री.शंकर गोरे, विरोधीपक्ष नेता मा.श्री.संपत बारस्‍कर, सभागृह नेता मा.श्री.रविंद्र बारस्‍कर, आरोग्‍य समितीचे अध्‍यक्ष तथा  नगरसेवक मा.डॉ.श्री.सागर बोरूडे, नगरसेवक मा.श्री.राजेंद्र कातोरे, भारतीय जैन संघटचे अध्‍यक्ष मा.श्री.आदेश चंगेडिया, आरोग्‍याधिकारी डॉ.श्री.अनिल बोरगे,  मा.श्री.किरण कातोरे आदी उपस्थित होते.

      यावेळी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे म्‍हणाले की, संपूर्ण शहरभर फिरत्‍या दवाखान्‍या मार्फत नागरिकांची अन्‍टीजन तपासणी करण्‍यात येणार आहे. जेणे करून रूग्‍णांवर ताबडतोब उपचार केले जातील.  जेणे करून रूग्‍ण अतिसंवेदन होणार नाही. मृत्‍यूचे प्रमाणही कमी होण्‍यास मदत होईल. या फिरत्‍या दवाखान्‍या मार्फत दररोज सुमारे 500 नागरिकांची अन्‍टीजन तपासणी करण्‍यात येणार आहे.

      यावेळी नगरसेवक मा.श्री.कुमारसिंह वाकळे म्‍हणाले की, बोल्‍हेगांव नागापूर येथे राहणारा वर्ग हा मध्‍यम वर्ग आहे. दररोज एमआयडीसीमध्‍ये काम करणारा कामगार वर्गही मोठया प्रमाणात आहे. या भागातील नागरिकांची कोरोनाची तपासणी होणे गरजेचे आहे. यासाठी आज पासून प्रथम या भागातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. व कोरोना रूग्‍णांवर ताबडतोब उपचार करण्‍यास सोपे जाईल कोणत्‍याही नागरिकांनी लक्षणे दिसल्‍यास हलगर्जीपणी न कर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post