बंगालमध्ये आता भगव्याचा बोलबाला सुरु झाला : देवेंद्र फडणवीस

बंगालमध्ये आता भगव्याचा बोलबाला सुरु झाला : देवेंद्र फडणवीस मुंबई :  पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. या राज्यात भाजपला 100 चा आकडा पार करता आलेला नाही. मात्र, या निवडणुकीमध्ये डावे आणि काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी मोठे वक्तव्य केले. पश्चिम बंगाल हा कम्युनिष्ट आणि काँग्रेसमुक्त झाला आहे. बंगालमध्ये आता भगव्याचा बोलबाला सुरु झाला आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपने मुसंडी मारत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील भाष्य केले. 

“पश्चिम बंगाल हा कम्युनिष्ट आणि काँग्रेसमुक्त झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये आता भगव्याचा बोलबाला सुरु झालाय. तेथे आता उजव्या विचारांना भक्कम पाया लाभला आहे. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. दुसऱ्याच्या घरी मुलगा झाल्यानंतर ते मिठाई वाटत आहेत. ढोल पिटत आहेत. येथे काँग्रेसची काय अवस्था झाली, हे पाहण्यासारखं आहे. ममता जिंकल्या म्हणजे काँग्रेस जिंकला असा अविर्भाव निर्माण झाला आहे. मागच्या वेळी आमचा फक्त 3 जागांवर विजय झाला आहे. यावेळी 80 पेक्षा जास्त जागांवर आम्ही निवडून आलो आहोत, असे फडणवीस म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post