नियम म्हणजे नियम...ई पास नसताना गोव्याला निघालेल्या क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याला पोलिसांनी रोखले

 

नियम म्हणजे नियम...ई पास नसताना गोव्याला निघालेल्या क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याला पोलिसांनी रोखलेमुंबई :  राज्यात कडक लॉकडाउन असून जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी ई पास बंधनकारक आहे. हा नियम डावलून मुंबई हुन गोव्याला निघालेला भारताचा युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ याला आंबोली येथे पोलिसांनी रोखले. आधी पास दाखव आणि नंतर पुढे जा असे पोलिसांनी सांगितल्याने पृथ्वीचा एकच गोंधळ उडाला. अखेर ऑनलाईन पास काढून पृथ्वी गोव्याकडे मार्गस्थ झाला. मुंबईहून प्रवास करताना पृथ्वीला कुठेही पास विचारण्यात आला नाही. मात्र आंबोली पोलिसांच्या जागरूकतेमुळे एका सेलिब्रिटी क्रिकेटरला एक तास थांबून राहावे लागले. पोलिसांच्या या सतर्कतेचे सध्या परिसरात कौतुक होत आहे.

पास शिवाय जाता येणार नाही असे सांगत पोलिसांनी पृथ्वीला आंबोलीतच  रोखले. त्याने पोलिसांना विनंतीही केली. पण पोलीस आपल्या कर्तव्यापासून जराही विचलित झाले नाहीत. पोलीस आपणास सोडणार नाही हे ओळखून पृथ्वीने  तिथूनच ऑनलाईन पाससाठी अर्ज केला. त्यानंतर एक तासाने त्याचा पास तयार होऊन त्याच्या मोबाईलवर आला. तो पास पोलिसांना दाखवून पुढे गोव्याकडे मार्गस्थ झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post