दुर्दैवी घटना...वीज कोसळून १८ हत्तींचा मृत्यू

दुर्दैवी घटना...वीज कोसळून १८ हत्तींचा मृत्यू

 गुवाहाटी : आसाममधील नागाव जिल्ह्यात एक अत्यंत ह्रदयद्रावक प्रसंग घडला आहे येथील जंगलात वीज पडून तब्बल 18 हत्तींचा मृत्यू झालाय. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) अमित सहाय यांनी सांगितलं की, बुधवारी रात्री काठियाटोली रेंजच्या कुंडोली वनक्षेत्रातील टेकडीवर वीज कोसळल्याने ही अप्रिय घटना घडली.

वनमंत्री परिमल सुक्लाबैद्य म्हणाले की, या 18 हत्तींचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला असं प्राथमिक तपासणीत आढळून आलं आहे. नेमके कारण शवविच्छेदनानंतरच कळू शकेल. वनमंत्री परिमल सुक्लाबैद्य हे शुक्रवारी घटनास्थळाचा दौरा करतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post