2 लाखांची लाच... पोलिस उपअधीक्षक व दोन पोलिस 'एसीबी'च्या जाळ्यात

 

2 लाखांची लाच... पोलिस उपअधीक्षक व दोन पोलिस 'एसीबी'च्या जाळ्यातजालना  - जालन्यात  पोलीस उपअधिक्षकांसह आणखी दोन पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. अ‍ॅट्रोसिटीच्या एका प्रकरणात मदत करण्यासाठी 5 लाखांची लाच या सर्वांनी मागितली होती. त्यापैकी काही रक्कम स्वीकारतानाचा त्यांना पकडण्यात आलं आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस नाईक संतोष अंभोरे आणि पोलीस शिपाई विठलं खार्डे असं अटक केलेल्या लाचखोर पोलिसांची नावं आहेत. अ‍ॅट्रोसिटी प्रकरणात मदत करण्यासाठी या सर्वांनी 5 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोड करून 3 लाख रुपयांवर बोलणी ठरली. त्यानंतर गुरुवारी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात 2 लाख रुपयांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून तिघांना अटक केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post