करोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा हॉस्पिटलमध्ये राडा, डॉक्टरांना मारहाण

करोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा हॉस्पिटलमध्ये राडा, डॉक्टरांना मारहाणनगर  - करोनाबाधित रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड करत डॉक्टरांनाही मारहाण केली. तारकपूरच्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये काल मध्यरात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकज तानाजी गडाख आणि रोहन बाबासाहेब पवार (दोघेही रा. टाकळी काझी, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. डॉ. राहुल अरुण ठोकळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सिटी केअर हॉस्पिटलमध्ये दोन आयसीयू असून तेथे 20 बाधितांवर उपचार सुरू आहेत. तानाजी नारायण गडाख (वय 72) हे 8 मे रोजी कोरोना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट झाले. प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर आयसीयुत उपचार सुरू होते.

ऑक्सिजन मास्क स्वत:च्या हाताने ते काढत असल्याने त्यांच्याजवळ एका नातेवाईकाला थांबण्याची परवानगी दिलेली होती. आयसीयुत इतर पेशंट तपासत असताना तानाजी गडाख यांनी ऑक्सिजन मास्क काढून टाकला. ब्रदर प्रवीण गायकर यांनी तो परत लावला. मात्र दरम्यानच्या काळात ते बेशुध्द झाले. पेशंटची तब्येत बिघडल्याचे नातेवाईकांना लेखी व तोंडी कळविले. साडेबारा वाजेच्या सुमारास तानाजी गडाख यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर मुलगा पंकज, रोहन हे हॉस्पिटलमध्ये आले. तेथे त्यांनी डॉक्टर ठोकळ व इतर कर्मचार्‍यांना शिवीगाळ केली. ओपीडीत डॉ. ठोकळ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी दोघाविरोधात हॉस्पिटलच्या मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी वैद्यकीय कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post