करोनावर गुणकारी औषध....DRDO च्या 'या' औषधाच्या वापरास सरकारची परवानगी

 

 DRDO नं बनवलेलं औषध करोना वर परिणामकारक, सरकारने दिली वापरास परवानगीनवी दिल्ली: भारत सरकारच्या औषध नियामक संस्थेने डीआरडीओ  (DRDO)बनवलेल्या 2 डेक्सोय डी ग्लुकोज 2-deoxy-D-glucose (2-DG) च्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. डीआरडीओने 2 डेक्सोय डी ग्लुकोजचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येईल, असंही म्हटलं आहे. डीआरडीओनं याविषयी प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. 


कोरोनाबाधित रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारपद्धती ऐवजी 2 डेक्सोय डी ग्लुकोजचा वापर पर्यायी उपचार पद्धती म्हणून केला जाईल. या औषधाची निर्मिती डीआरडीओच्या आयएमएस आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी एकत्रितपणे केली आहे. या औषधाच्या चाचण्या केल्या गेल्या तेव्हा याचा डोस घेतलेल्या रुग्णांमध्ये याची सकारात्मक लक्षण दिसून आली आहेत. रुग्णांचा बरा होण्याचा वेग चांगला असून ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होतं, असंही डीआरडीओकडून सांगण्यात आलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post