राज्यात उद्या आणि परवा लसीकरण होणार नाही

 


राज्यात उद्या आणि परवा लसीकरण होणार नाहीमुंबई: राज्यात उद्या आणि परवा लसीकरण होणार नाही. कोविन अॅप अपडेशनसाठी बंद राहणार असल्याने लसीकरण होणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील बदललेल्या अंतराचं नियोजन करण्यासाठी कोविन ॲप बंद राहणार आहे. त्यामुळं 15 आणि 16 मे रोजी लसीकरण प्रक्रिया बंद असणार आहे. 


कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी पहिला डोस घेतल्यानंतर किमान 12 आठवड्यांचे अंतर ठेवण्याबाबत केंद्र सरकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगने पुढील दोन दिवसात कोविन अॅपवर काही बदल केले जाणार आहेत. त्यामुळं 15 आणि 16 मे रोजी लसीकरण सत्राचे कुठेही आयोजन करण्यात येणार नाही, अशी माहिती आहे. कोविन पोर्टलवरील बदल पूर्ण होताच लसीकरणाबाबत पुढील सूचना देण्यात येतील असं देखील सांगण्यात आलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post