कोवॅक्सिन लसीचे उत्पादन वाढणार...भारत बायोटेकचा तीन कंपन्यांशी तंत्रज्ञान हस्तांतरण करार

 कोवॅक्सिन लसीचे उत्पादन वाढणार...भारत बायोटेकचा तीन कंपन्यांशी तंत्रज्ञान हस्तांतरण करारअहमदाबाद : भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीच्या निर्मितीला आता गती मिळणार असून गुजरातमधील अहमदाबादच्या तीन कंपन्यांनी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची निर्मिती करण्यासाठी करार केला आहे. या आधी आणखी सार्वजनिक कंपन्यांनी कोवॅक्सिनची निर्मिती करण्यासाठी करार केला आहे. त्यामुळे देशात लस निर्मितीला गती मिळणार आहे. 

गुजरात सरकारच्या मालकीच्या गुजरात बायोटेक रिसर्च सेंटर आणि खासगी क्षेत्रातील कंपनी असलेल्या हेस्टर बायोसायन्स आणि ओम्नीबीआरएक्स बायोटेक्नॉलॉजी या कंपन्यांनी भारत बायोटेकशी कोवॅक्सिनच्या तंत्रज्ञान हस्तांतरणासंबंधी एका करार पत्रावर सह्या केल्या आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post