आ.निलेश लंके 'कोरोना केसरी' किताबाचे मानकरी, अडीच किलो चांदीची गदा व सन्मानपत्र

 

कोल्हापूरकरांनी 'कोरोना केसरी' किताबाने केला आ.निलेश लंके यांचा ‌‌‌‌‌‌‌‌‌‌गौरवनगर: हिंदकेसरी पै.संतोष वेताळ फाऊंडेशन कोल्हापूरकर यांच्या वतीने आ.निलेश लंके यांना 'कोरोना केसरी' किताबाने  सन्मानित  करण्यात आले. अडीच किलो चांदीची गदा व कोरोना केसरी सन्मानपत्र व रक्कम रुपये.१.०० लक्ष धनादेश देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल आभार व्यक्त करताना आ.लंके म्हणाले की,  करोनाच्या जागतिक महामारीच्या काळामध्ये माझ्या सर्व सहकारी मित्रांनी तसेच या कोविड सेंटर उभारणीत ज्या सर्वांनी मोलाची कामगिरी बजावली या सर्वांचा हा बहुमान आहे असे मी समजतो!प्रत्येकाने आपले सेवाकार्य मानवतेच्या दृष्टीने करणे हे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं आध्य कर्तव्य मी समजतो.मी स्वतः मैदानांत उतरून आपल्या लोकांसाठी कोरोनाशी दोन हात करत आहे.परंतु यात माझ्या सर्व सहकारी मित्राचा सिंहाचा वाटा आहे.

हिंदकेसरी फाउंडेशन सुर्ली,कराड च्या वतीने हिंदकेसरी मा.पै.संतोष वेताळ (आबा) यांच्या हस्ते अडीच किलो चांदीची गदा,एक लाख रुपयेचा धनादेश,सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच मला कोरोना केसरी हा किताब देण्यात आला हा संपूर्ण 'किताब मी माझ्या मतदार संघातील माझ्या माय-बाप जनतेला समर्पित करतो!

                 यावेळी मा.श्री.नवनाथ पाटील (भाऊ),सुर्ली गावचे सरपंच मा.श्री.दत्तात्रय वेताळ,समाजसेवक मा.निसार मुल्ला,मा.पै.सोनू मदने,माजी उपसरपंच मा.श्री.कृष्णत मदने,पै.अमोल लंके,पै.सूरज भुजबळ,पै.प्रमोद गोडसे हे उपस्थित होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post