मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी घेतला पदभार

 

मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी घेतला पदभारनगर: आयएएसच्या दीड महिन्यांच्या प्रशिक्षणावर गेलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर सोमवारी नगरला पुन्हा हजर झाले आहेत. दीड महिन्यांचे प्रशिक्षण करोना संसर्गामुळे अवघ्या एक महिन्यांत संपविण्यात आल्याने क्षीरसागर नगरला परतले आहेत.

5 एप्रिलाला क्षीरसागर हे मसुरीला आयएएसच्या प्रशिक्षणासाठी गेले होते. या दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाचा पदभार हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर हे नगर जिल्हा परिषदेत रुजू झाले असून त्यांनी नियमित कारभार हाती घेतला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post