2 डोसनंतरही निवांतपणा येणार नाही...तिसरा बूस्टर डोस घ्यावा लागण्याची चिन्हे

2 डोसनंतरही निवांतपणा येणार नाही...तिसरा बूस्टर डोस घ्यावा लागण्याची चिन्हे नवी दिल्ली: भारतात सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे. भारतात डबल म्युटंट विषाणू दिसून आला आहे. हा म्युटंट विषाणू अधिक संसर्गजन्य असल्याचं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यानुसार आता उपाययोजना सुरू आहेत. ब्रिटनमध्ये आता ट्रिपल म्युटंट कोविड विषाणू  सापडला आहे. तो डबल म्युटंटपेक्षाही अधिक संसर्गजन्य आहे. या विषाणूची नवनवी रुपं दिवसेंदिवस अधिक संसर्गजन्य होत असल्यामुळे जगभरातील शास्रज्ञ कोविड लशींचा बूस्टर डोस घेणं गरजेचं आहे, असं मत व्यक्त करत आहेत. कदाचित येत्या वर्षभरात हा बूस्टर डोस घ्यावा लागू शकतो.

अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीजचे  संचालक अँथनी फाउची म्हणाले, की कोरोनाविरुद्धच्या लढ्यात येत्या काळात बूस्टर डोस घेणं महत्त्वाचं होणार आहे. तसंच फायझर या लस उत्पादक कंपनीचे सीईओ अल्बर्ट बाउर्ला म्हणाले, ‘ येत्या आठ ते 12 महिन्यांच्या काळात लसीचा बूस्टर डोस घ्यावा लागू शकतो, त्यामुळे आम्ही त्यासंबंधी कामाला सुरुवातही केली आहे.’

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post